आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेंगशुई थेरपीसाठी शास्त्रज्ञ महिलेने दिले आपल्या मुलीला त्याच्या ताब्यात; त्याने केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
मुंबई- फेंगशुई आणि क्रिस्टल थेरपीच्या नावाखाली 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे कोर्टाने या तथाकथित थेरपिस्टला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
चारुहास नाईक (65) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडबंदर रोडवर त्याचा फ्लॅट आहे. पीडित मुलीचे वडील सीए आहेत. तर आई शास्त्रज्ञ आहे. ही मुलगी अभ्यासात हुशार आहे. मात्र ती डिप्रेशनमध्ये गेल्याने नाईक हा तिच्यावर क्रिस्टल थेरपी करत होता. 30 ते 40 टक्के तिला बरे वाटले. मात्र पुन्हा ही मुलगी थेरपी करण्यासाठी घोडबंदर रोडवरील नाइकच्या फ्लॅटवर आईसोबत आली होती. मात्र आईला काम असल्याने आई मुलीला त्याठिकाणी सोडून निघून गेली. तर तुमच्या मुलीला घरी आणून सोडतो असे नाईक म्हणाला होता. त्याचदरम्यान नाईकने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीनेच मुलीला तिच्या घरी आणून सोडले. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...