आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरेगावात विवाहित महिलेवर बलात्कार, घटनेने स्थानिक रहिवाशांत संताप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. सद्दाम हुसैन खान असे या नराधमांचे नाव असून त्याला आरे सब वे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, खान याला आज वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
सद्दाम हुसैन खान हा गोरेगाव परिसरातील फिल्टरपाडा येथे आई-बहिणीसह राहतो. सद्दाम तेथेच एका ठिकाणी हेल्पर म्हणून काम करतो. त्यामुळे तो पीडित महिलेला ओळखतो. तिचा पतीही हेल्पर म्हणूनच काम करतो. तीन-चार दिवसापूर्वी दुपारी तीननंतर आरोपी पीडित महिलेच्या घरी आला व तिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर तो पळून गेला होता. तीन दिवसानंतर तिने घडलेला प्रकार पतीला सांगितला. अखेर रविवारी सायंकाळी तिने व तिच्या पतीने आरे सब वे पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर सद्दाम हुसैन खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.