आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डोंबिवलीतील मानपाडा परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अजमत (20) आणि फुर्शीद (22) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा परिसरात एका नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी दोन्ही आरोपी हे रंगरंगोटीचे काम करीत होते. शेजारीच आणखी एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत एक मजूर कुटुंब राहत आहे. संबंधित मुलगी शाळेत जाते तर आई-वडिल दिवसभर मजूरी करतात. त्यामुळे अजमत व फुर्शीद यांनी तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली.
बुधवारी रात्रीही हे दोघे तिच्यावर लक्ष ठेवून होते. संबंधित मुलगी नैसर्गिक विधीसाठी इमारतीच्या दुस-या मजल्यावर गेली असता आरोपींनी तिचा पाठलाग केला व तिचे तोंड धाबून तिला एका रूममध्ये नेले. तेथे तिचे तोंडू दाबून दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर संबंधित मुलीने त्यांच्यापासून सुटका केली. घरी जाताच तिने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अजमत आणि फुर्शीद यांना अटक केली.