आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत आयपीएस अधिकार्‍याचा मॉडेलवर बलात्कार; सुनील परसकर यांच्याविरुद्ध तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍याने मॉडेलवर बलात्कार केल्याचे प्रकरण मुंबईत उघडकीस आले आहे. याप्रकरणी मॉडेलने पोलिस उपमहानिरीक्षक सुनील परसकर यांच्याविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी रात्री परसकर यांनी एका हॉटेलमध्ये नेऊन आपल्यावर बलात्कार केला. तसेच यापूर्वी त्यांनी आपल्यावर अनेकदा अत्याचार केल्याचे पीडित मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे. परसकर यापूर्वी अतिरिक्त पोलिस आयुक्त (उत्तर विभाग) या पदावर कार्यरत होते.

धारावीत महिलेवर गँगरेप
रमजाननिमित्त खरेदीसाठी निघालेल्या एका महिलेवर चौघांनी चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तीन जण फरार झाले आहेत.