आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीला जेलमधून सोडविण्यासाठी घेतले 5 लाख रुपये; त्यानंतर तिच्यासोबत केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पतीला जेलमधून सोडविण्यासाठी महिलेकडून 5 लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेने पैसे परत मागितल्यावर पतीच्या मित्राने  तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सुर्यकांत शिंदे असे महिलेवर बलात्कार करणाऱ्याचे नाव आहे. 

 

याप्रकरणी पीडित विवाहितेने खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुर्यकांत शिंदेविरोधात बलात्कार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नराधम सुर्यकांत हा एका शाळेचा संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 42 वर्षीय पीडित विवाहिता राहते. पीडितेचा पती एका गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्या पतीचा मित्र व ओळखीचा असलेला नराधम सुर्यकांत पीडित विवाहितेच्या घरात घुसला. यावेळी त्याने जीवे ठार मारण्याची धमकी देत, तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तुझ्या पतीला केसमधून निर्दोष मुक्त करुन जेलमधून सोडवतो, असे आमिष दाखवत तिच्याकडून पाच लाख रुपये उकळले. तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एफ. कदम करीत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...