आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारपीडित मुलीची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बलात्कार करून अश्लील क्लीप प्रसारित करण्याची धमकी दिल्याने एका अल्पवयीन मुलीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाणे येथे उघडकीस आली. मोहंमद सुलतान ऊर्फ राजा असे नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजा हा नालासोपारा येथील रहिवासी आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने पीडित मुलीवर अत्याचार करून अश्लील क्लीप तयार केली होती. काही दिवसांनंतर मुलगी गरोदर राहिली. यानंतर तिने राजाकडे लग्नाची मागणी केली. मात्र, त्याने याबाबत कोणालाही माहिती दिल्यास अश्लील क्लीप सर्वांना दाखवण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने रॉकेल ओतून जाळून घेतले.