आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बलात्कार, छेडछाडीच्या घटना वाढल्या, एनजीओच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबापुरीत २०१०-११ या वर्षापासून आतापर्यंत बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत तब्बल तिपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यामुळे राजधानी दिल्लीपाठोपाठ मुंबईही महिला, मुली व ज्येष्ठांसाठी असुरक्षित होत चालल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रजा फाउंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापक विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले की, २०१४ मध्ये २०१३ च्या तुलनेत बलात्काराची प्रकरणे ४९ टक्क्यांनी वाढली. विनयभंग, शोषणाची प्रकरणे ३९ टक्क्यांनी वाढली. २०१० -११ ते २०१४-१५ या वर्षांत बलात्काराच्या घटनांत २९० टक्के आणि शोषणाच्या गुन्ह्यांत २४७ टक्क्यांची वाढ झाली.

२०१०-११ मध्ये बलात्काराचे केवळ १६५ गुन्हे दाखल झाले होते. २०१४-१५ मध्ये हा आकडा ६४३ वर गेला. मेहता म्हणाले, बलात्काराच्या प्रकरणांत दोषारोप सिद्ध होण्याचाही मोठा मुद्दा आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये अश प्रकरणांतील २७ टक्के आरोपींनाच शिक्षा झाली.
११% कर्मचारी कमी
पोलिस खात्यात ११% कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याचेही समोर आले आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हेशोध) धनंजय कुलकर्णी यांनी १.३५%च मनुष्यबळाची वानवा असल्याचा दावा केला.
२२ हजारांवर लोकांचे सर्वेक्षण
- निताई मेहता यांच्या प्रजा फाउंडेशनने शहरातील २२,८५० नागरिकांची मते जाणून घेत सर्वेक्षण केले.
- नागरिकांनी (दक्षिण मुंबई) सर्वाधिक गुन्ह्यांना तोंड देत असल्याचे कबूल केले.
- ४०% लोकांचे म्हणणे आहे की, या भागात महिला, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाही.
- लोकांनी गुन्ह्यांबाबतीत पोलिसांशी संपर्क केला.
-५३% लोक पोलिसांच्या कारवाईवर समाधानी.
- गेल्या चार वर्षांत मुंबई एकूण गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली. { साखळी चोरीत मागील तुलनेत यंदा मध्ये ४४% घट झाली.
- वाहन चोरी आणि दंगलींच्या प्रकरणांत २०१३-१४ वर्षाच्या तुलनेत २०१४-१५ मध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे.
- २०१४-१५ मध्ये हत्येच्या घटनांत मात्र वाढ झाली आहे.