आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rapidly Improving Health Of Ncp Leader R R Patil

आबांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा, चालण्याचा सराव करतानाचे फोटो झाले व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर आर पाटील यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. आबांवर सध्या मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आबा चालण्याचा सराव करीत असल्याचे फोटो सध्या व्हॉटस अॅपवर व्हायरल झाले आहेत.
आर आर आबांवर लीलावती रूग्णालयात उपचार सुरु आहेत. आबांना तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. आबांवर 6 टप्प्यात किमोथेरपी करण्यात आली व त्या यशस्वीपणे झाल्या आहेत. तसेच रॅडेशन उपचारदेखील यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसापासून आबांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागल्याचे समजते आहे.
आबांची प्रकृती गंभीर असल्याचे मागील काही दिवसापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे खंडन केले होते. आबांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांची कन्या स्मिता पाटील यांनीही म्हटले होते. आबांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही स्मिता यांनी केले होते. आबांची प्रकृती ठीक असल्याचे पुढे येऊ लागल्याने त्यांच्या हिंतचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पुढे पाहा, आबांचे व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेले फोटो...