आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुणा शानबागवर अत्याचार करणारा सोहनलाल वाल्मीकी ‘यूपी’त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केईम रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करणारा सोहनलाल वाल्मीकी हा उत्तर प्रदेशात सापडल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.
अत्याचार झाल्यानंतर तब्बल ४२ वर्षे कोमात राहिल्यानंतर अरुणा शानबाग यांचे १५ मे रोजी निधन झाले. त्यानंतर अरुणांवर अत्याचार करणाऱ्या सोहनलालबाबत चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने गाजियाबाद जिल्ह्यातील परपा येथे सोहनलाल याची भेट घेतल्याचा दावा केला आहे. २७ नोव्हेंबर १९७३ रोजी सोहनलाल याने अरुणा यांच्यावर केईम रुगणालयात बलात्कार करून साखळीने त्यांचा गळा दाबला. या घटनेनंतर अरुणा या तब्बल ४२ वर्षे कोमात राहिल्या होत्या. यादरम्यान, अरुणा यांच्यातर्फे वकील पिंकी विरानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इच्छामरणासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला हाेता.

बलात्काराच्या अाराेपावरून शिक्षा नाहीच : सोहनलाल
अरुणांवर आपण बलात्कार केला नव्हता. तसेच आपल्याला या गुन्ह्यात शिक्षाही झाली नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकरणाला बलात्काराचे स्वरूप का देता? असा उलट सवाल सोहनलालने पत्रकाराला केला.
बातम्या आणखी आहेत...