मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शनिवारी (06 सप्टेंबर) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटला. महाराष्ट्र देशातील महत्वाचे आणि देशाला शक्ती देणारे राज्य आहे अशा शब्दात सुरूवात करत शरद पवार यांनी प्रचाराच्या कार्यक्रमातील भाषणाला सुरूवात केली. महाराष्ट्राचा विकास हा आघाडी सरकारनेच केला आहे. मात्र अजूनही आदिवासी, दलित, ओबीसी आणि मुस्लीम समाजाकरीता अनेक विकासात्मक कामे करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, आघाडी सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशिल राहिले आहे. महिला सबलीकरणामध्ये आघाडी सरकारची भूमिका ही खुपच महत्त्वाची राहिली आहे. महिलांसाठी आम्ही अनेक क्षेत्र उघडे करून दिले. विद्यूत क्षेत्रातही विशेष पद काढून आम्ही जवळपास 2000 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रात राबवलेले महिला धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
या कार्यक्रमात आघाडी सरकारच्या कामाचा पाढा वाचत असताना भाजपवर टिका करण्याचीही संधी पवारांनी सोडली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधिशाला राज्यपालाचे पद देणे हे अत्यंत चुकीचे आहे. तर केरळच्या राज्यपालाने राष्ट्रपतींना शपथ दिली ही खुपच अपमानास्पद बाब होती असेही ते म्हणाले.
अमित शहा यांच्यावर तोफ डागत ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत त्यांना महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही असेही पवार यावेळी म्हणाले.
विधानसभेच्या निवडणूकीत अनेकजण संधीसाधूपणा काढत दुसर्या पक्षात जात आहेत. अशा बंडखोरांचे नावही तोंडून काढू नका. केवळ आत्मविश्वासाने निवडणूक लढा म्हणजे सत्ता
आपल्यालाच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, काय म्हणाले छगन भुजबळ