आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राष्ट्रवादी’ची चाैथ्या स्थानावर घसरण, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्गज मराठा नेत्यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत या पक्षाची थेट चाैथ्या क्रमांकावर घसरण झाली. या पक्षाचे केवळ १९ नगराध्यक्ष निवडून आले. मागच्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीसाठी चौथा क्रमांक हा जिव्हारी लागणारा आहे. मराठा आरक्षण तसेच नोटाबंदीच्या वातावरणाचा फायदा घेऊन आपण बाजी मारू, अशी अटकळ राष्ट्रवादीने बांधली होती. पण, त्यांचे स्वप्न काही साकार होऊ शकले नाही.
राष्ट्रवादीला चौथा क्रमांक मात्र मान्य नाही. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चार टप्प्यात निवडणुका होणार असून सर्व टप्पे पार पडल्यानंतर अंतिम निकालावर नजर टाकता येईल. पहिल्या टप्प्याच्या यशाने कोणीही हुरळून जाऊ नये’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे १९ नगराध्यक्ष जिंकून आले असले तरी १० ठिकाणी घड्याळ सोडून इतर चिन्हांवर आमच्याच पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट असल्याने अशा ठिकाणी पक्षाने कोणालाच अधिकृत चिन्ह दिले नव्हते. त्यांनी आपापली आघाडी करून निवडणूक लढवली होती, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.
भाजपला साथ एमअायएमची : मलिक : भाजपच्या यशाबाबत मलिक म्हणाले, ‘स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपाकडून राज्याचा सर्व्हे करण्यात आला होता. यात वाॅर्डनिहाय निवडणूक घेतली तर भाजपा भुईसपाट होऊ, असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. यासाठीच थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक राबवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला. याचबरोबर सत्तेला पैशांची जोड देत भाजपने निवडणुका जिंकल्या. हे कमी म्हणून की काय काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या उमदेवारांसमोर एमआयएमचे उमेदवार उभे केले होते.
अपक्षही अामचेच
राष्ट्रवादीचे ४८५ नगरसेवक निवडून आले असून इतर चिन्हांवर लढलेले राष्ट्रवादीचे १८२ नगरसेवकांनी सरशी मिळवली असून ही संख्या पाहता राष्ट्रवादीचे खरे बलाबल हे ५६७ वर जाते. भाजपच्या ६१० सदस्यांच्या तुलनेत ही संख्या कमी नाही. लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत भाजपच्या मतांत घसरण झाली आह. भाजप सरस असे सरळधोपट विधान करणे चुकीचे असून या निवडणुकीचे अाणखी चार टप्पे बाकी अाहेत, याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...