आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड व कोळसा मिळवणे ही ऊर्जा क्षेत्रासमोर मोठी आव्हाने - रतन टाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भूखंड व कोळसा मिळवणे ही ऊर्जा क्षेत्रासमोर मोठी आव्हाने म्हणून उभी ठाकली आहेत. यामुळे परवडणार्‍या दरांत वीजपुरवठा करणे अवघड होत चालले असल्याचे प्रतिपादन टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी केले आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत टाटा म्हणाले की, देशातील वाढत्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी कोळसा हा मुख्य स्रोत आहे. यामुळे कोळसा आणि जमिनींच्या लिलावावर गंभीर प्रश्नचिन्ह असून त्यांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. परवडणार्‍या दरांत वीज उपलब्ध करून देणे, हे एक मोठे आव्हान म्हणून समोर येत आहे. 2030 पर्यंत वाढलेली लोकसंख्या आणि आधुनिक जीवनशैलीमुळे वीजेची मागणी वाढणार असल्याचे रतन टाटा यांनी सांगितले.
विशेष म्हणजे कोळसा घोटाळ्यावरील कॅगचा अहवाल संसदेत मांडला जात असताना टाटांनी याबाबत वक्तव्य केले आहे. स्पर्धात्मक बोलीचा नियम डावलून काही खासगी कंपन्यांना कोळसा खाणींचे वाटप झाल्यामुळे देशाच्या तिजोरीचे तब्बल 1.86 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. टाटा समूहाच्या टाटा स्टील आणि टाटा पॉवर या कंपन्यांना विविध राज्यांत कोळसा खाणपट्टे मिळाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद आहे.