आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांच्या मदतीला टाटा, सलमान, प्रियंका; पत्र लिहून केली होती विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्ध तसेच मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मंत्री महादेव जानकर यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह  सलमान खान, प्रियंका चोप्रा तसेच बाॅलीवूडमधील तारेतारकांकडे मदतीचा हात मागितला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येत असून टाटा, सलमान व प्रियंका यांनी मदत करण्याचे मान्य केले आहे.    
 
आपल्या विभागातील याेजना तळागाळात जाण्यापासून ते त्यांचा प्रचार- प्रसार होण्यासाठी जानकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. पशू, दुग्ध व मत्स्य व्यवसायाला चालना मिळाल्यास आणि यामधून जास्तीचे दोन पैसे पदरात पडल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबेल, असा विश्वास जानकर यांना वाटत आहे. यासाठी जानकर यांनी स्वत: पत्र लिहून दिग्गजांना मदतीची विचारणा केली होती. यासाठी पहिला प्रतिसाद खुद्द रतन टाटा यांनी दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...