आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरी : होळी घेऊन जाताना पूल कोसळला, एकमेकांच्या अंगावर पडले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी - रत्नागिरीत होळीला दुर्घटनेचे गालबोट लागले आहे. कळंबुशीमध्ये सोमवारी सकाळी होळीचे माड नेत असताना ३५ वर्ष जुना पूल कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत किमान २० ते २५ जण जखमी झाले आहेत. यातील ११ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळंबुशीमध्ये होळी साजरी करण्यासाठी अन्य गावांमधील ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते. 

संगमेश्वरच्या कळंबुशी-खाचरवाडी देवीचा माड घेऊन सर्व ग्रामस्थ होळी उभारण्यासाठी जात होते. सर्व ग्रामस्थ गावातील ३५ वर्ष जुन्या लाकडी पुलावर आले असता पूल कोसळला. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती पुलावर आल्याने पूल कोसळल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नदीपात्रात पाणी नसल्याने अनर्थ टळला. पण पुलावर लोकांची संख्या जास्त असल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. खांद्यावर होळी असल्याने अनेकजण होळीखाली दबले गेले होते.
 
कसा झाला अपघात 
- संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी-खाचरवाडी येथे देवाचा माड घेऊन जाण्याची येथे प्रथा आहे. रविवारी (12 मार्च) गावकरी होळी उभारण्यासाठी माड घेऊन निघाले होते. 
- गावकरी साकववरुन जात असताना ओव्हरलोड झाल्याने साकव मधोमध तुटला आणि लोक नदीत पडले. एकमेकांच्या अंगावर कोसळले. 
- यात 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
 
किती वर्ष जुना साकव
- कोकणात अनेक छोट्या नद्या आणि ओढे आहे. ते पार करुन जाण्यासाठी त्यावर साकव उभारले जातात.
- कोकणातील अनेक साकव  जुने झाले असून धोकादायक आवस्थेत आहेत. 
- कळंबुशी-खाचरवाडी येथील तुटलेला साकव 35 वर्षे जुना होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...