आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गायकवाड यांनी नियमाचे उल्लंघन करून भूखंड दिले’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव व विद्यमान माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुंबई प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त असताना मुंबईतील बिल्डरांना नियम धाब्यावर बसवून भूखंड दिले असून या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांनी शुक्रवारी केली. तसेच आपण राज्यपाल, लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनाही तसे पत्र लिहिल्याचे ते म्हणाले.

गायकवाड यांनी एमएमआरडीएचे आयुक्त असताना कांदिवली येथील दहा एकर जमीन किरण हेमानी या बिल्डरला एसआरए योजना राबवण्यास दिली. अशी जमीन कोणतेही टेंडर ना काढता शासनाला देता येत नाही. या जमिनीची किंमत एक हजार कोटी रुपयांची आहे. मुंबईच्या कलेक्टर यांनी सदर जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. परंतु या जमिनीवर त्यापूर्वी टॉवर उभे राहिल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...