आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ratnakar Matkari's First Film Investment Releases With Parents And Teachers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालक, शिक्षकांशी संवादाने होणार ‘इन्व्हेस्टमेंट’चे प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठीतील आघाडीचे लेखक रत्नाकर मतकरी यांनी पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शित केलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा चित्रपट सामाजिक विषयावरील असल्याने फिल्मी पद्धतीने त्या चित्रपटाचे प्रमोशन न करता मुंबईतील महत्त्वाच्या शाळांमध्ये शिक्षक व पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून चित्रपट पोहोचवणार असल्याचे रत्नाकर मतकरी यांनी सांगितले.

‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या पाल्याच्या भविष्यावर, संस्कारांवर एक प्रकारे ‘इन्व्हेस्टमेंट’ केल्याची भावना आताच्या पालकांत मूळ धरत आहे. त्यातूनच पुढे मुलांच्या मानसिकतेत कसा बदल होत जातो याचे वर्णन या सिनेमातून केले आहे. हा विषय पालकांनी, मुलांनी आणि विशेषत: शिक्षकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर राहील,’ अशा पद्धतीने रत्नाकर मतकरी यांनी चित्रपटाचे रिअलिस्टिक प्रमोशन करणार असल्याचे सांगितले.


राष्‍ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट
तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संदीप पाठक, संजय मोने अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला आहे. त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने मराठी मान अभिमानाने उंचावली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले, ज्यात मान्यवरांनी चित्रपटाविषयी दिलेल्या प्रतिक्रिया, चित्रपटाचे ट्रेलर्स आणि फोटोज टाकण्यात आले आहेत. 20 सप्टेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.