आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत रेव्ह पार्टीवर धाड, 14 तरूणी व 11 तरूणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील घोडबंदर रोडवरील एका अलिशान बंगल्यात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी धाड टाकून 14 तरूणींसह 11 तरूणांना बुधवारी अटक करण्यात आली. 14 तरूणींत तीन मोराक्को देशाच्या तरूणींचा समावेश आहे. बड्या घरातील ही मंडळी असून, या पार्टीचे स्वरूप रेव्ह असेच होते. कारण पार्टीत अमली पदार्थांसह विदेशी मद्याचा वापर होता.
घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात एका अलिशान बंगल्यात ही दुपारपासून पार्टी सुरु होती. पार्टीचे ठिकाण कासारवडवली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर होते. मात्र पोलिसांना कसलीही कुणकुण लागली नव्हती. एका बड्या घरातील हतीम लकडावाडा तरूणाचा वाढदिवस असल्याने ही पार्टी आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे. ही रेव्ह पार्टी बंगल्यात 4.30 वाजल्यापासूनच सुरु झाली होती. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांना एका नागरिकाने याबाबत बंगल्यात काहीतरी सुरु असल्याचे कळविले.
पोलिसांनी 7.30 वाजता बंगल्यावर धाड टाकली तेव्हा संबंधित तरूण-तरूणी दारूच्या नशेत झिंगलेली होती. तसेच अश्लील नृत्य करीत होती. धाड टाकली तेव्हा पोलिसांनी विदेशी दारूचा मोठा साठा आढळला. तसेच पार्टीत अमली पदार्थाचा वापर करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. धाडीत मात्र कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, ताब्यात घेतलेल्या तरूणीपैकी तीन विदेशी म्हणजे मोराक्को देशाची मुली आढळून आल्या. त्या पार्टीत कशा आल्या कोणाच्या सांगण्यावरून आल्या व इथल्या स्थानिक तरूण-तरूणींशी त्यांचा स्नेह कसा याबाबतची माहिती पोलिस रात्री उशिरापर्यंत मिळवत होते.
घोडबंदरच्या त्या बंगल्यात कायमच पार्ट्या रंगतात- निसर्गाचे वरदान लाभलेल्या ठाणे शहरात घोडबंदर हा उच्चभ्रू वर्गाचा परिसर म्हणून गणला जातो. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि घोडबंदर रोड परिसरात उद्योगपती व बड्यांचे बंगले आहेत. उच्चभ्रू लोकांची कायमच येथे ये-जा व वर्दळ असते. त्यामुळे या बंगल्यावर कायम पार्ट्या होत असतात असे बोलले जाते. तसेच येथील बंगले एका दिवसासाठी भाड्याने दिले जातात. एका दिवसाला 20 ते 25 हजार भाडे घेतले जाते. बडे लोक असल्याने हे बंगले भाड्याने घेऊन नशिल्या पार्टी करतात तसेच अनैतिक व्यवसायही होत असल्याची कुजबूज आहे.
छायाचित्र- तरूणींना पोलिस ठाण्यात नेताना...