आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेव्ह पार्टी धाड फेम नांगरे-पाटील चौकशीच्या फे-यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नियम डावलून रेव्ह पार्टीवर धाड टाकल्याप्रकरणी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची राज्य महिला आयोगामार्फत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी दिली.
20 मे रोजी जुहू परिसरातील हॉटेल ओकवुडमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने छापा टाकून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यात काही सेलिब्रिटीजचाही समावेश होता. यापैकी 44 जणांनी ड्रग्ज घेतल्याचे तपासणीत निष्पन्नही झाले आहे. मात्र या कारवाईविरोधात वाय. पी. सिंग यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. यावरून महिला आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सिंग यांच्या मतानुसार, पोलिसांनी नियमांचा गैरवापर करून महिला आणि मुली असलेल्या पार्ट्यांवर धाडी टाकल्या. या पार्टीतून ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांचे रक्त व लघवीचे नमुनेही बोगस असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या सदस्या शोमिता बिसवा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रेव्ह पार्टीवरचा छापा बनावट, युवा काँग्रेसचा आरोप
मुंबई रेव्ह पार्टी: अटकेतील 19 विदेशींमध्ये आयपीएल चिअर गर्ल्स?
रेव्ह पार्टीत नशेत बेधूंद होऊन नाचतात या ललना (पाहा व्हिडिओ)