आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीला ‘लाल दिवा’: सदाभाऊंऐवजी तुपकरांना मिळाले अध्यक्षपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महायुतीचे सरकार येऊन पाच महिने झाले तरी मित्रपक्ष स्वाभिमानी संघटनेला सत्तेपासून दूरच ठेवण्यात आले होते. अखेर या मित्रपक्षालाही एक ‘लाल दिवा’ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतला. पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. विशेष म्हणजे सरकारवर टीकेची झोड उठवणारे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोतांना मात्र पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. रिपाइं तसेच राष्ट्रीय समाज पक्ष या दोघांनाही थोडाबहुत सत्तेचा वाटा मिळाला खरा, पण स्वाभिमानी संघटनेला मात्र आजवर दुर्लक्षित ठेवले हाेते.
रविकांत तुपकरांच्या कामाची दखल
रविकांत तुपकर हे खामगावचे असून बुलडाणा जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे मोठे काम केले आहे. याची दखल घेऊन पक्षाने त्यांना राज्याच्या युवा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारीही तुपकर यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली.