आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणप्रकरणी रवींद्र गायकवाड यांचे उद्धव ठाकरेंकडे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून चर्चेत आलेले उस्मानाबाद येथील शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असे गेले काही दिवस सांगितले जात होते. अखेर शनिवारी त्यांनी शिवसेना भवन येथे ठाकरे यांची भेट घेतली.
 
 गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचारी मारहाणप्रकरणी ठाकरे यांच्याकडे स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणानंतर गायकवाड ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार होते. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ठाकरे यांनी त्यांना दिल्लीतच थांबण्यास सांगितले होते. संपूर्ण प्रकरणाची माहिती  गायकवाड यांनी अनिल देसाई यांना दिली. देसाई यांनी ठाकरे यांना अहवाल दिला होता. त्यानंतर गायकवाड यांनी संजय राऊत यांच्याशीही चर्चा केली होती.

माझी तक्रार ऐकली नाही.. 
- गायकवाड म्हणाले, वाद एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने सुरू केला होता. तो माणूस वेडा आहे. अगदी किरकोळ वाद होता. मीही एक सामान्य व्यक्ती आहे. माझी तक्रार ऐकली नाही. जर जनतेच्या प्रतिनिधींशी असे वागत असतील तर ते सामान्य जनतेला कशी वागणूक देत असणार. 
- 23 मार्चला उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला आले होते. प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींमुळे त्यांनी तक्रार केली. पण काहीही कारवाई झाली नाही तेव्हा त्यांनी गोंधळ घातला. एका कर्मचाऱ्याला 25 वेळा सँडल मारल्याचे त्यांनी मान्य केले होते. 
- एअर इंडियाने या प्रकरणी एअरपोर्ट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सरकारी अधिकाऱ्यांना एकाच जागी काम करता येते : फडणवीस...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...