आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravindra Waikar Sulks Over Not Being Allowed In Cabinet Meet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅबिनेटमध्ये डावलल्याने राज्यमंत्री संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून राज्यमंत्र्यांना दूर ठेवण्याच्या निर्णयाने शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर संतापले आहेत. "महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होता येत नाही, मग मंत्री असल्याचा काय फायदा?' असा सवाल करत या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे वायकर म्हणाले. आघाडी सरकारच्या काळातही फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच बैठकीत प्रवेश होता. दरम्यान, कॅबिनेटमध्ये राज्यमंत्र्यांना स्थान नसले तरी मंत्री परिषदेसाठी मात्र त्यांना आमंत्रित करण्यात येते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशी मंत्री परिषद बोलावत असत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या शेवटच्या कार्यकाळातही मंत्री परिषदेचे आयोजन केले जात होते.