आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयएसआयएस’च्या ई-मेल आयडीवरून मेल, रघुराम राजन यांना ठार मारण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना जिवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाला आहे. सूत्रांनुसार, आयएसआयएस583847@जीमेल.कॉम आयडीवरून याच महिन्याच्या सुरुवातीला तो त्यांच्या अधिकृत ई-मेल अकाउंटवर मिळाला.

दिव्य मराठी नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार, त्यात "मला तुम्हाला मारण्यासाठी पैसे मिळाले आहेत. जर तुम्ही मला त्यापेक्षा जास्त रक्कम दिली तर आपण निर्णय घेऊ शकतो,’ असा मजकूर आहे. इराक व सिरियातील आयएसआयएस या अतिरेकी संघटनेचे नाव ई-मेल आयडीवर असल्याने पोलिस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी त्याला दुजोरा दिला. या ई-मेल आयडीची माहिती पुरवावी, अशी सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने गुगलकडे केली. हा मेल ऑस्ट्रेलिया, इटली, पोलंड, अमेरिका, कॅनडा, नायजेरिया, बेल्जियम, जर्मनी, हाँगकाँग व युक्रेन या दहा देशांतून अॅक्सेस करण्यात आला आहे.