आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Governor Raghuram Rajan Says About Development

तोटा वाढवून विकास साधणे धोक्याचे: राजन यांचे सरकारवर ताशेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिझर्व्हबँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या आर्थिक धारेणावर ताशेरे ओढले आहेत. अतिरिक्त कर्ज घेऊन किंवा तोटा वाढवून विकासाला गती देणे धोकादायक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याआधी ब्राझीलने अशी चूक केली असून, त्यांना याची किंमत मोजावी लागली आहे. आर्थिक मजबुती संकटात गेल्यास अस्थिरता येते. सरकार आणि रिझर्व्ह बँकेला महागाई कमी करण्याचा प्रयत्न करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एनसीएईआरमध्ये सी. डी. देशमुख व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जागतिक पातळीवरील अार्थिक मंदीनंतर ब्राझीलने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन पॅकेज देऊन चांगला विकासदर मिळवला होता. त्या वेळी जगभरात त्यांचे कौतुक होत होते. २०१० मध्ये ब्राझीलने ७.६ टक्के विकासदर मिळवला होता. मात्र, गेल्या वर्षी त्यांचा उणे ३.८ टक्के विकासदर नोंदवण्यात आला. त्यांचे कर्ज डाउनग्रेड करून "जंक' श्रेणीत टाकण्यात आले आहे.
विकासदर वाढवण्यासाठी सरकारच्या वतीने या वर्षी राजकोशीय तोटा वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी या तोट्याला ३.६ टक्क्यांवर आणण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, आता त्याला ३.९ टक्के ठरवण्यात आले आहे. या विरोधातच राजन यांची इशारा दिला आहे. २०१५ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा एकूण रोजकोशीय तोटा सातवरून वाढून ७.२ टक्के झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, "उदय' योजनेवरही टीका