आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरकॉमची महाराष्ट्रासह 8 राज्यातील व्हॉईस कॉलिंग 1 डिसेंबरपासून सेवा बंद; ट्रायने दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अनिस अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) 1 डिसेंबरपासून व्हॉईस कॉलिंग सेवा बंद करणार आहे. त्यामुळे या वर्षाअखेर ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्ककडे वळावे लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने याबाबत माहिती दिली आहे.
 
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. हरियाणा, उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम), तामिळनाडू आणि केरळ या आठ राज्यांमध्ये कंपनीकडून 2G आणि 4G सेवा पुरवली जाते, रिलायन्स कम्युनिकेशन 1 डिसेंबर 2017 पासून ग्राहकांना फक्त 4G सेवाच देऊ शकेल. त्यामुळे व्हॉईस कॉलिंग देऊ शकणार नाही, असे आरकॉमने म्हटल्याचे ट्रायने सांगितले आहे.
 
आरकॉमने व्हॉईस कॉलिंग बंद होण्यासोबतच पोर्ट करण्यासंबंधित सर्व सूचना अगोदरच दिल्या आहेत. आरकॉमने कोणतीही पोर्टिंग रिक्वेस्ट रिजेक्ट करु नये, शिवाय इतर कंपन्यांनीही 31 डिसेंबर 2017 पर्यंत आरकॉम ग्राहकांची पोर्टिंग रिक्वेस्ट स्वीकारावी, असे आदेश ट्रायने दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...