आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरानं नीट काम केलं नाय तर त्याला मारन..! जानकरांच्या ९१ वर्षीय अाईंची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची ९२ वर्षांची आई लेकाच्या शपथविधी साेहळ्यासाठी हजर होती. कार्यक्रमानंतर मुलाचे काैतुक करून या माउलीने जानकर यांना अाशीर्वाद दिले. - Divya Marathi
कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची ९२ वर्षांची आई लेकाच्या शपथविधी साेहळ्यासाठी हजर होती. कार्यक्रमानंतर मुलाचे काैतुक करून या माउलीने जानकर यांना अाशीर्वाद दिले.
मुंबई - ‘इंजनेर झाल्यापासून पोरगा घरी आला नव्हता. तो बाेलत व्हता तो खरं होतं. खरंच आज पोरानं आमचं पांग फेडलं. तो गरिबासाठीच काम करंल. पण त्यानं चांगलं काम करावं. त्यानं नीट काम नाय केलं तर मीच त्याला मारन...’ आपल्या लेकाच्या कौतुक करतानाच त्याला मायेने गोंजारणाऱ्या ९१ वर्षीय अाई सोनुबाई अापला लेक व नूतन कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्याविषयी बाेलत हाेत्या. २७ वर्षे घरीच न गेलेले जानकर आईच्या या मायेने हरखले. त्यांच्या शपथविधीनंतर इतका भंडारा उधळण्यात आला की विधान भवन परिसराला ‘जेजुरी’चे स्वरूप प्राप्त झाले हाेते.

शपथविधी सोहळ्यासाठी सर्वाधिक गर्दीही जानकर समर्थकांची होती. ६० पोत्यांत भरून आणलेल्या भंडाऱ्याने विधान भवनासमोरच्या परिसरातील लोक आणि रस्त्यांनी पिवळी चादर पांघरली होती.

‘मुख्यमंत्र्यांचा रात्री फोन आला की घरच्या लोकांना शपथविधीला बोलावून घ्या. मी म्हटलं, साहेब मी लग्न केलेलं नाही. मुख्यमंत्री म्हणाले, आईला बोलावून घ्या. त्यामुळे रातोरात आई, भाऊ, बहीण अाणि पुतणे व भाच्यांना बोलावून घेतले. मी गेली २७ वर्षे घरी गेलेलो नाही. वडील दीड वर्षापूर्वी वारले तेव्हा हेलिकाॅप्टरने घरी गेलो होतो. मी कांशीराम यांचा शिष्य आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श मानत बँकेत खाते उघडायचे नाही, लग्न करायचे नाही आणि घरी जायचे नाही, अशा तीन शपथा मी सार्वजनिक जीवनाला सुरुवात करताना घेतल्या होत्या. त्याचे पालन मी आजही करत आहे,’ असे जानकर म्हणाले.

‘मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर िवश्वास आहे. आदिवासींच्या आरक्षणावर गदा न आणता ते धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जानकर यांनी शुक्रवारी किरमिजी रंगाचा कोट घातला होता. शपथविधीनंतर ते बाहेर पडले तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत एकच जल्लोष केला. भंडाऱ्याची उधळण करत ढोल, ताशे वाजवत मिरवणुक काढली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाल्या सदाभाऊ खोत यांच्या आई..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...