आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read About Engineer Shivshaink, Who Is Become A Minister In Fadanvis Govt

वाचा, समाजकारण व जनसंपर्कामुळेच या शिवसैनिकाच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रारंभी शहर, तालुक्यात शिवसैनिक म्हणून काम सुरू करणाऱ्या आमदार दादा भुसे यांच्या गेल्या 20 वर्षांच्या काळातील पक्षनिष्ठा झपाटलेल्या जनसंपर्कात अखंडित आलेल्या यशाने त्यांना राज्यमंत्रिपदापर्यंत पोहचविले. विधानसभा निवडणूक लढवत विजयाची हॅट‌्ट्रिक साधतानाही त्यांनी कामाच्या पद्धतीत तसूभर बदल केला नाही. विरोधातदेखील त्यांनी केलेल्या जनहिताच्या कामांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही लक्ष वेधल्याने भुसे सेनेच्या प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत बसवले गेले. त्याचेच फळ म्हणून राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तब्बल दहा वर्षांनंतर तालुक्याला आता हक्काचा लाल दिवा पाहायला मिळणार आहे. भुसेंच्या शिवसैनिक ते राज्यमंत्रिपदाच्या प्रवासाने तालुकावासीयांची इच्छापूर्ती झाली असून, अपेक्षा मात्र आणखी वाढल्या आहेत.
ठाणे येथे पाटबंधारे खात्यातील कनिष्ठ अभियंतापदाचा राजीनामा देऊन मालेगावात आलेल्या भुसे यांनी सन 1994 मध्ये समाजकार्य सुरू केले. सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष (स्व.) आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भुसे यांना प्रारंभी स्थानिक सेना पदाधिका-यांनी नाकारले होते. मात्र, फक्त समाजकारण जनसंपर्क या एकमेव पॅटर्नवर भुसेंचे काम सुरू झाले. संघटना वाढत गेली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत भुसेंचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे भुसेंची दखल घेत त्यांना तालुकाप्रमुखपद मिळाले. 2004 मध्ये सेना-भाजपातील बंडाळीने त्यांना अपक्ष उमेदवारीची संधी मिळून ते प्रथम निवडून गेले. अपक्ष असले, तरी त्यांनी 'मातोश्री'चरणीच निष्ठा वाहिल्या. प्रारंभी पाच वर्षे मिळालेली आमदारकी जनसामान्यांसाठी सुरू ठेवलेला लढा यामुळे तळागळातील त्यांची जनसंपर्काची व्याप्ती वाढत गेली. तालुक्यातील प्रमुख विरोधकांनी सक्रिय राजकारणाकडे पाठ फिरवल्याने भुसेंना पर्याय उरला नाही.
पुढे आणखी वाचा, या इंजिनिअर शिवसैनिकाबाबत...