आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्वासाठी तुरुंगात जाण्यास तयार : तोगडिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रक्षोभक भाषणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी हिंदुत्वासाठी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

आपण हिंदुत्वासाठी काहीही करण्यास तयार आहोत, असे तोगडिया यांनी दूरध्वनीवरून सांगितले. ते कुंभमेळ्यासाठी अलाहाबादला गेले आहेत. राष्ट्रहितासाठी बोलणे गुन्हा ठरत नाही, असा दावा तोगडिया यांनी केला. महाराष्ट्रातील विश्व हिंदू परिषदेचे नेते व्यंकटेश आबदेव यांच्या फोनवरून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी आबदेव यांनी तोगडिया यांची अटक झाल्यास देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा दिला. त्यांनी अकबरुद्दीन ओवेसीविरुद्ध बोलून काहीही चूक केली नाही. सरकारमध्ये धाडस असेल तर त्यांना अटक करून दाखवावी, असे आबदेव म्हणाले.

तोगडियांविरुद्धच्या कारवाईसाठी कायदेशीर मत विचारात घेतले जात आहे. समाजात दुफळी निर्माण करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले होते. 22 जानेवारी रोजी भोकरमध्ये (जि. नांदेड) झालेल्या जाहीर सभेत तोगडिया यांनी एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसीवर टीका केली होती.