आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Movie On Poor Muslim Family\'s Girl Married Old Man

मुस्लिम मुलीची व्यथा पडद्यावर; बिग बी किंवा नसरुद्दीनकडे म्हातार्‍या शेखची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गरीब मुस्लिम घरातील आई-वडिलांना पैशाचे आमिष दाखवून दुबईतील म्हातार्‍या शेखशी लग्न झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. अशाच एका सत्य घटनेवर आधारित 'यहां अमिना बिकती है' नावाचा चित्रपट तयार होत असून यामध्ये अमिताभ बच्चन किंवा नसिरुद्दीन शहा दुबईतील शेखची भूमिका करणार असल्याची माहिती चित्रपटाची नायिका रेखा राणाने दिली.
रेखा राणाचा पहिला चित्रपट 'तारा' गोल्डन ज्युबिली साजरी करत आहे. या चित्रपटाला जगभरातील 24 चित्रपट महोत्सवांमध्ये 30 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. रेखालाही उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने मिळवून दिला आहे. अंधेरीस्थित आपल्या घरी बोलताना रेखाने सांगितले, 'तारा'मध्ये मी एका बंजारा मुलीची भूमिका साकारली होती. ही अशिक्षित मुलगी गावाला कसा न्याय मिळवून देते ते या चित्रपटात दाखवले होते. महिला सक्षमीकरणावर आधारित 'तारा'नंतर मी आणखी एका वेगळ्या विषयावरील चित्रपट साइन केला आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट सेटवर जाणार असून 'तारा'प्रमाणेच हा चित्रपटही समाजातील दुर्व्यवस्थेवर प्रहार करणार आहे. कुमार राज प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
वेगळ्या कथेमुळे भूमिकेला होकार- आपल्या देशात विविध भागांमध्ये अशा अनेक मुलींची दुबईच्या शेखबरोबर लग्ने लावून दिली आहेत. या मुलींना शेख दुबईला घेऊन जात असत आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसाय वा घरकामाला लावले जात असे. त्यांचा प्रचंड छळही केला जात असे. या विषयाच्या कथेला कोणीच आजवर हात घातला नव्हता. त्यामुळेच या विषयावरील चित्रपट समोर येताच मी लगेचच अमिनाच्या भूमिकेला होकार दिल्याचे रेखा राणा हिने सांगितले.
(छायाचित्र- रेखा राणा)
पुढे वाचा, 'मुक्काम पोस्ट धानोरी' मराठी चित्रपट तामिळ भाषेत येणार...