आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा सांगण्यात येतोय मुंबईतील भेंडीबाजार इमारत दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ; हे आहे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्यात 2013 मध्ये कोसळलेल्या इमारतीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. - Divya Marathi
ठाण्यात 2013 मध्ये कोसळलेल्या इमारतीचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई- दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथे गुरुवारी 117 वर्ष जुनी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा या घटनेचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओची divyamarathi.com ने सत्यता पडताळून पाहिले असता हे सत्य समोर आले आहे. 
 
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
- ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका खिडकीतुन बनविण्यात आला आहे. यात एका महिलेचा आणि पुरुषाचा आवाज ऐकु येत आहे. 
- सुमारे 30 सेकंदाच्या या व्हिडिओत एक जुनी इमारत दाखवण्यात आली आहे. व्हिडिओच्या सुरवातीला बिल्डिंगचा काही भाग कोसळताना दिसत आहे. त्यानंतर अचानक ही संपूर्ण इमारतच कोसळते.
- ट्विटरवर रणजित कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना भेंडीबाजार दुर्घटनेचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या काही मित्रांनाही टॅग केले आहे.
- तहर नावाच्या एका व्यक्तीनेही हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, हुसैनी बिल्डिंग कोसळली, भेंडी बाजार आणि अनेक लोक या व्हिडिओला भेंडीबाजारच्या घटनेचा व्हिडिओ म्हणून शेअर करत आहेत.
 
काय आहे व्हिडिओचे सत्य
- ट्विटरवर शेअर होणारा हा व्हिडिओ divyamarathi.com पर्यंतही पोहचला. आम्ही त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तो मुंबई अग्निशमन दलाकडे पाठवला. 
- तेथे हा व्हिडिओ 21 सप्टेंबर 2013 चा असल्याचे सत्य समोर आले. याला भेंडीबाजारच्या घटनेचा व्हिडिओ सांगत चुकीच्या पध्दतीने शेअर केले जात आहे.
- मुंब्रा येथे केवळ 8 ते 10 वर्ष जुनी 4 मजली इमारत कोसळली होती. तेथे इमारतीला चिरा पडल्यावर ती रिकामी करुन घेण्यात आली होती.
- प्रशासनाकडून सांगण्यात आले की या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. स्थानिका नागरिकांनी मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 लोक दबले होते, असे सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी बिल्डरसहित 4 जणांना अटक केली होती.
- तपासात हे सुध्दा समोर आले की, मुंब्र्यातील कोसळलेल्या इमारतीसमोर राहणाऱ्या 15 वर्षाच्या हसन कुरेशी नावाच्या मुलाने हा व्हिडिओ बनवला होता.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि हा व्हिडिओ
 
बातम्या आणखी आहेत...