आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Recall Of Gopinath Mundes Funeral On His Death Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL : मुंडेंच्या अंत्यसंस्कारात फुटला होता समर्थकांच्या भावनांचा बांध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्या धक्का दायक निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी म्हणजे परळीतील त्यांच्या साखर कारखान्याच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मुंडे साहेबांचे समर्थक लाखोंच्या संख्येने यावेळी आलेले होते. लोकांच्या भावनांचा बांध फुटल्याने यावेळी दगडफेडही झाली होती. तसेच संतप्त लोकांनी पोलिसांच्या आणि इतर गाड्याही जाळल्या होत्या. मुंडेंच्या अंत्य संस्काराबाबात या माध्यमातून आज आम्ही माहिती देत आहोत...

मुंबईतील श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर परळी येथे मुंडेंवर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी लाखो लोक आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी आलेले होते. प्रत्येकाची एकच इच्छा होती, ती म्हणजे आपल्या नेत्याचे एकवार अंत्यदर्शन घेण्याची. मुंडेच्या अंत्य दर्शनासाठीही त्याचमुळे एकच गर्दी झाली होती. गर्दीमुळे चेंगरी चेंगरी व्हायला सुरुवात झाली होती. लोकांना राग अनावर होत होता. त्यावेळी पंकजा मुंडे वारंवार सगळ्यांना शांत राहण्याची विनंती करत होत्या. पण कोणीही त्यांचे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाने केलेली सर्व तयारीचे तीन तेरा झाले. सगळीकडे धावपळ सुरू झाली आणि चेंगरा चेंगरीही झाली. पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला आणि त्यात अनेक लोक जखमी झाले. लोकांनीही दगडफेक करत राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या आणि इतर अनेक गाड्यांची जाळपोळही केली. याच गोंधळात मुंडेंच्या मोठ्या कन्या पंकजा यांनी जड अंतकरणाने मुंडेंच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अंत्य संस्कारानंतर लोकांनी मुंडे यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली, त्यानंतर तोडफोड केल्याने परिस्थिती पुन्हा चिघळली होती. त्यानंतर सुमारे चार ते पाच तास परळीकडून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्काराचे PHOTOS