आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या बँकबुडव्यांकडून २५० कोटींची वसुली करा, चव्हाणांची खतगावकरांवर जोरदार टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नांदेड जिल्हा बँक खतगावकर-टाकळीकर गटाने बुडवली होती. नुकत्याच झालेल्या बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत या मंडळींनी गैरमार्गाचा अवलंब केल्याने ते निवडून येऊ शकले आहेत, असा आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष व नांदेडचे खासदार अशाेक चव्हाण यांनी शुक्रवारी केला. शासनाने या संचालकांकडून बँकेचे बुडालेले २५० कोटी वसूल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

नांदेड जिल्हा बँकेत चव्हाण यांचे पॅनल पराभूत झाले अाहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी, शिवसेना अाणि भाजप यांच्या शेतकरी विकास पॅनलची नांदेड जिल्हा बँकेत सरशी झाली अाहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अनेक गैरप्रकारांचा अवलंब केला आहे.
आता निवडून आलेल्या भास्करराव पाटील खतगावकर- टाकळीकर या गटाने या बँकेच्या कर्जवाटपात मनमानी केली होती. जवळच्या लोकांच्या कारखाने, सूत गिरण्यांना भरमासाट कर्जे दिली. त्यामुळे बँकेचे २५० कोटी रुपये पाण्यात गेले. इतर जिल्हा बँकेत मनमानी करणा-या संचालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून बँकेचे पैसे वसूल करण्यात आले आहेत. तोच न्याय नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकांनाही लावावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

चव्हाणांच्या किसान समृद्धी गटाचे २१ पैकी ५ संचालक निवडून आले आहेत. आमचे संचालक ठेवीदारांच्या अाणि शेतक-यांच्या हितासाठी काम करतील, असे सांगून नांदेड जिल्हा बँक वाचवण्यासाठी विलासराव देशमुख अाणि मी अनेकदा प्रयत्न केले. बँकेला १०० कोटी रुपये अनुदान म्हणून दिले होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या निवडणुका नांदेडचा कौल असल्याचे त्यांनी फेटाळले.
बातम्या आणखी आहेत...