आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बॅकफूटवर, आरजे मलिश्काने मानले प्रसारमाध्यमांचे आभार; ट्‍विटरवर पोस्ट केला व्हिडीओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’, या गाण्यातून आरजे मलिश्का मेन्डोसा हिने बृहन्मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. मलिश्काच्या याच गाण्यावरून महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला चांगलीच मिरची झोंबली आहे. मलिश्कावर महापालिकेने कारवाई केली आहे. या परिस्थितीत मलिश्काला तमाम मुंबईकर आणि प्रसारमाध्यमांकडून पाठिंबा मिळत आहे. यामुळे तिने तमाम प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत. आभाराचा व्हिडिओ तिने ‍ट्‍विटरवर पोस्ट केला आहे.

मलिश्काने काल (बुधवारी) ट्वीट करुन तमाम प्रसारमाध्यमे मलिश्काच्या बाजूने उभी राहिली आहेत. 'मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे', असेही तिने म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...अल्पावधीत सोशल मीडियावर 'मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का', या गाण्याचा धुमाकूळ...
बातम्या आणखी आहेत...