आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Red Light Area Children Rehablitation Through Music And Acting

रेड लाइट एरियाच्‍या दलदलीतून बाहेर निघताहेत सेक्‍स वर्कर्स, मुलांची बदलली LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचा कामठीपुरा हा देशातील तिसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. येथे काम करणा-या सेक्स वर्कर्सची परिस्‍थिती अत्‍यंत वाईट आहे. सेक्स वर्कर्सच्‍या पुनर्वसनासाठी काम करणा-या प्रेरणा या संस्‍थेने एका अहवालात या बाबीचा खुलासा केला आहे. मात्र, सेक्‍स वर्कर्सचे मुलं म्युझिक आणि अभिनयाच्‍या माध्‍यमातून नवीन वाट शोधत आहेत. काही संस्‍थेच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या प्रशिक्षणाची विदेशातही सोय केली जात आहे.
- 21 वर्षाची शितल ड्रम वाजविण्‍यात निपूण आहे.
- एका एनजीओच्‍या मदतीने शितल अमरिकेतून संगीत प्रशिक्षण घेऊन आली.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार शितल म्‍हणते, ''सेक्स वर्करची मुलगी म्‍हणून जगणे सोपे नाही.''
- ''आईला या परिस्‍थितीत पाहून मला खूप वाईट वाटत होते.''
- शीतल सांगते की, वयाच्‍या 15 व्‍या वर्षी ती या संस्‍थेशी जुळली.
- तिचे ड्रम वाजवण्‍याचे कौशल्‍य पाहून तिला ट्रेनिंगसाठी अमेरिकेत पाठवण्‍यात आले.
- शितल सध्‍या पुण्‍याच्‍या ताल स्कूलमध्‍ये ड्रम शिकवत आहे.
- कामठीपुरामध्‍ये राहणा-या मुलींनाही ती ड्रम शिकवते.
- शितलने सांगितले की, एक व्‍यक्‍तीने तिच्‍या आईसोबत लग्‍न केले होते. पण त्‍याने माझ्यावर बलात्‍कार केला. मला वाटले की, मी पण याच दलदलमध्‍ये अडकेल.
वर्ल्ड टूरने बदलली LIFE
- कामठीपुराच्‍या सेक्‍स वर्कसच्‍या मुली कविता आणि श्वेता यांनी अमेरिकाच्‍या बार्ड यूनिवर्सिटीमधील एका कार्यक्रमात भाग घेतला.
- या कार्यक्रमातून त्‍यांना संगीत आणि गायन शिकवण्‍यात आले.
- दरम्‍यान त्‍यांना वर्ल्ड टूर करण्‍याची संधीही मिळाली.
- कविता म्‍हणते, ''15 देशातून आलेल्‍या सेक्स वर्कर्सच्‍या मुलांसोबत 114 दिवसांचा टूर होता.
- यातून अमेरिका, मॅक्सिको, जपान व इंग्लंड जाऊन संगीत शिकण्‍याची संधी मिळाली.
- श्वेता कुट्टीला या कार्यक्रमानंतर 28 लाख रुपयांची शिष्‍यवृत्‍ती मिळाली.
- या पैशातून तिला दुस-या मुलीचे भले करायचे आहे.
- श्वेता म्‍हणाली, '' आईला या नरकातून बाहेर काढण्‍याचा आमचा पहिला प्रयत्‍न असेल.''
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सेक्‍स वर्कर्स या दलदलमधून कशा बाहेर पडल्‍या..
कामठीपु-यात कुठून आणल्‍या जातात सेक्‍स वर्कर्स.. काय आहे इतिहास..