आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूग-उडदाचे कमी उत्पादन; केंद्राकडून दखल; राज्यात नाफेडची टीम सर्वेक्षणासाठी येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद आणि सोयाबीनचे उत्पादन अत्यंत कमी झाल्याने शेतकरी चिंतेत अाहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली असून नाफेडची टीम सर्वेक्षणासाठी राज्यात दाखल झाली आहे. ही टीम मराठवाडा व िवदर्भाचा दाैरा करून कमी उत्पादकतेची आणि खरेदीची कारणे शोधून काढून उपाययोजना सुचवणार आहे.   
 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दरवर्षी अास्मानी संकट अाेढावत अाले अाहे. या वर्षी खरीप हंगामाच्या शेवटी अवकाळी पाऊस आल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या पिकांची उत्पादकता कमी झाली. परिणामी देशात सर्वाधिक कमी खरेदी झालेल्या राज्यात महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. नाफेडकडून खरेदी केला जाणारा शेतीमाल हा चांगल्या दर्जाचा असतो. राज्यात अशा चांगल्या दर्जाचा मालाची खरेदी दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, यंदा ही खरेदी कमी झाल्याने झाल्याने केंद्राने टीम पाठवून कारणे शोधून काढण्याचे ठरवले आहे.    
यावर्षी खरिपाच्या हंगामात शेवटी मोठा पाऊस झाल्याने सोयाबीन, उडीद, मुगाचा दाण्यावर डाग होते. तसेच दाणे लहान झाल्याने खरेदी होऊ शकचली नाही. शेतीमालाची उत्तम प्रतवारी  झाल्याशिवाय नाफेड खरेदी करत नाही. त्यांच्याकडून चांगल्या प्रतीचा शेती माल घेतला जातो.    
कमी खरेदीची कारणे शाेधणार
महाराष्ट्राकडून नेहमीच चांगल्या प्रतीच्या सोयाबीन, मूग, उडदाची नाफेडला अपेक्षा असते. मात्र, या वेळी तसे होऊ शकले नाही. भविष्यात अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी कमी खरेदीची कारणे शोधणार असून उपाययोजना सांगितल्या जातील. याचबरोबर खरेदी कमी असल्याने जो शेतीमाल उपलब्ध आहे त्याची खरेदी कमी भाव देऊन केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही टीम आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.
 
व्यापाऱ्यांकडून कमी भावात खरेदी   
यंदा राज्यात सोयाबीन एकरी ५ क्विंटल झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली  आहे. मूग, उडदाचे उत्पादनदेखील आंतरपीक असल्याने एकरी साधारणतः ५ क्विंटलच उत्पादन झाले आहे. सुरुवातीला ओला आणि लहान असल्याने सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विकण्यात आला. हमी भाव ३ हजार असताना व्यापाऱ्यांनी २१०० ते २२०० मध्ये खरेदी करण्यात आली. याशिवाय मूग आणि उडीद पिकाला हमीभाव नसल्याने त्यांची खरेदीदेखील व्यापाऱ्यांनी अतिशय कमी भावात केली.
बातम्या आणखी आहेत...