आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राज्यातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जुन्या कर्जांचे पुनर्गठण केले जाईल. ज्यामुळे या हंगामातील ऊस उत्पादकांची थकीत बिले आणि आगामी हंगामासाठीही कारखान्यांना भांडवल उपलब्ध होईल’, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.

शेकापचे जयंत पाटील यांनी अडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘थकीत कर्ज हेच साखर कारखान्यांपुढील अडचण आहे. कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले तरच या कोंडीतून मार्ग
निघणार आहे. राज्य सरकारच्या आग्रहामुळे राज्यातील ऊस उत्पादकांना यंदाच्या हंगामातील ८२ टक्के पैसे अदा करण्यात यश आले आहे. मात्र, सुमारे ३२०० कोटी रु.चे देयके अजूनही थकीत आहेत. केंद्राच्या सॉफ्टलोनमधून साखर कारखान्यांना २२०० कोटी रुपये मिळतील. उर्वरित एक हजार कोटी रुपयांची अडचण आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करेल,’ अशी ग्वाही पाटील यांनी िदली. राज्यातील केवळ आठ साखर कारखाने एफआरपीची ५० टक्के रक्कम देऊ शकले नाही. त्यांना वगळून इतर सर्व कारखान्यांना मदत करण्यात येईल.’