मुंबई - मुंबई हायकोर्टाने एका निर्णयात मधुचंद्रावेळी जोडीदाराने लैंगिक संबंधास नकार देणे, हा अत्याचार ठरत नसल्याचे म्हटले आहे. कोर्टाने पुढे म्हटले आहे, की लग्नानंतर पत्नीने एखाद वेळी सलवार किंवा शर्ट-पँट परिधान केले आणि कार्यालयीन कामानिमीत्त इतर शहरांमध्ये गेली तर तो पतीवर अत्याचार होत नाही.
न्यायाधीश व्ही.के. ताहिलरमानी आणि न्यायाधीश पी.एन. देशमुख यांच्या पीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे, की लग्न व्यवस्था पू्णपणे समजून घेतली पाहिजे. एका ठराविक कालावधीमध्ये एखाद-दोन वेळा घडलेल्या घटनांना अत्याचार म्हणता येणार नाही.
हायकोर्टाच्या द्विसदस्यीय पीठाने स्पष्ट केले, की पती-पत्नीमध्ये दिर्घकाळ चाललेल्या तक्रारीमुळे दोघांपैकी एकाला हे संबंध आता संपले पाहिजे, असे वाटले पाहिजे. जोडीदाराची वागणूक ही मानसिक त्रासा समान वाटली पाहिजे.
केवळ चिडचीड, वाद आणि रोजच्या दैनंदिन आयुष्यातील लहान-मोठ्या घटनांना वैवाहिकी आयुष्यात अत्याचार म्हणता येणार नाही आणि ही कारणे घटस्फोटासाठी पूरेशी नसल्याचे पीठाने म्हटले आहे.
पुढाल स्लाइडमध्ये, काय आहे प्रकरण