आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मांसाहारी’च्या वादावर पालिकेने तोंड उघडले, पोलिस, नाेंदणी विभागात तक्रार करण्याचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत गेली काही वर्षे मांसाहारी कुटुंबांना घर नाकारण्याच्या सातत्याने घटना पुढे येत असताना हातावर घडी तोंडावर बोट लावून बसलेल्या मुंबई महापालिकेने एकदाचे तोंड उघडले अाहे. ‘कोणास मांसाहारीच्या मुद्यांवर घर नाकारल्यास अशा पीडितांनी पोलिस आणि मुद्रांक नोंदणी विभागाकडे तक्रार करावी,’ असा सल्ला पालिका आयुक्तांनी िदला आहे.
विकार अहमद खान यांना मुस्लिम असण्याच्या कारणांवरुन वसईतील हॅपी होम सोसायटीत घर िवक्रीस नकार दिला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अटकही झाली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेत मांसाहरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सन २०१४ मध्ये ‘मनसे’च्या वतीने शाकाहरी आणि मांसाहारी असा भेदभाव करुन घरे नाकारणारे बिल्डर तसेच हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकारी यांच्यावर कारवाईबाबत सुधार समितीत प्रस्ताव दाखल झाला होता. अशा प्रकरणात कारवाई करण्यांबाबत मुंबई महापालिका अधिनियमात काहीही तरतूद नाही, असे कारण देत सदर प्रस्ताव पालिका प्रशासनाने फेटाळला होता. मात्र सुधार समितीने त्यावर सविस्तर चर्चा केली आणि याप्रकरणी पुनविर्चारार्थ समितीने सदर प्रस्ताव पुन्हा आयुक्तांना पाठवला होता. त्यावर पालिका आयुक्तांनी भूमिका घेतली असून सध्या हा विषय सुधार समितीच्या अजेंड्यावर आला आहे.
मांसाहरीचे कारण देऊन घरे विकण्यास किंवा भाड्याने देण्यास नकार िदल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न िनर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा पीडितांनी पाेलिस आणि मुद्रांक नोंदणी िवभागाकडे आपली तक्रार नोंदवावी, असे सुधार समितीला दिलेल्या उत्तरात पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
मुंबईत मांसाहारीच्या मुद्यावर केवळ मुस्लिमांनाच घरे नाकारली जातात असे नाही, तर जैन, गुजराथी, मारवाडी सोसायट्यांमध्ये मराठी कुटुंबांनाही घरे िवकत दिली जात नाहीत. मराठी माणसाचा कैवार घेणाऱ्या शिवसेना, मनसे शाकाहारी आणि मांसाहारीच्या भेदभावास कडवा विरोध करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...