आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंंच्या याचिकेवरील सुनावणीस नकार, पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा मुंबई हायकोर्टाचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सद्य:स्थितीत सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला.

घोटाळ्याबाबत सीबीआय चौकशीची मागणी करण्यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला मुंबई हायकोर्टाने दिला. या याचिकेद्वारे हजारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. साखर कारखाने तोट्यात दाखवले व त्यांची खासगी कंपन्यांना कवडीमोल भावाने विक्री करून शासनाचे २५ हजार कोटींचे नुकसान केल्याचा आरोप अण्णांनी आपल्या याचिकेत केला होता.अण्णांनी याचिकेत शरद पवार व अजित पवारांना प्रतिवादी केले आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात यावा, अशी मागणीही अण्णांनी केली आहे.

अगोदर पोलिसांत तक्रार तरी द्या : याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने अगोदर पोलिसांत या घोटाळ्यासंबंधी तक्रार तरी दाखल करा, असा सल्ला अण्णांना दिला आहे.  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ही सुनावणी झाली.
बातम्या आणखी आहेत...