आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नाेंदणीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी लवकरात लवकर साेडत काढण्यात यावी, असे अादेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सोडत जाहीर करण्यास उशीर होत असला तरी या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाणार नाहीत, असेही राज्य निवडणूक अायुक्त ज.स. सहारिया यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नव्या मतदारांना नाेंदणीसाठी १४ अाॅक्टाेबरपर्यंत मुदत देण्यात अाली.
बृहन्मुंबईसह १५ महापालिका, २६ जिल्हा परिषदा २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी १४ ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. एकीकडे विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये यासाठी विशेष मोहीम उघडले जात असून राज्यभरातील लाखो गृहनिर्माण संस्थांवरही यासाठी विशेष जबाबदारी टाकण्यात येत आहे. यासाठी सहकार विभाग आणि संबंधित महापालिकांनी गृहनिर्माण संस्थांना तसे पत्र पाठवले असून त्यांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या लोकांची नावे नोंदवून घ्यावेत, तसे आवाहन करावे, असे सहारिया यांनी सांगितले.
‘खरे तर कायद्यानुसार गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष सचिव यांनी रहिवाशांची नावे मतदार यादी नोंदवून घेणे बंधनकारक आहे. मात्र या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करणे शक्य नाही,’ अशी कबुलीही त्यांनी दिली.
जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण- तरूणींना १४ ऑक्टोबरपर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदविण्याची अंतिम संधी आहे. कारण जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारीत तयार होणारी मतदार यादी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...