आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण चर्चेत श्रेयवादावरून जुंपली ! सत्ताधारी-विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर: मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्वच पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात प्रस्ताव दाखल करून चर्चा सुरू केली. मात्र, आरक्षणासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न केले या श्रेयवादातून सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर आरोप केले.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत चर्चा सुरू केल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांनीही आक्रमकपणे मते मांडली.
- लाखोंच्या संख्येने मराठ्यांचे मूक मोर्चे निघाले नसते तर सरकारने आरक्षणाच्या दिशेने पावले उचलली नसती. - धनंजय मुंडे
- राणे समितीने अभ्यासपूर्ण अहवाल दिला. समितीवर होणारी टीका निराधार आहे.
-अहवालात त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी या सरकारने काय केले ? - नारायण राणे
बातम्या आणखी आहेत...