आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relatives Who Was Elected In Navi Mumbai MNC Election

एक महापालिका, गणगोतांचा मेळा!, नवी मुंबईत सात जोडपी निवडून अाली...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकाच महापालिका सभागृहात पती आणि पत्नी दोघेही एकाच वेळी नगरसेवक असणे ही दुर्मिळ गोष्ट. नवी मुंबईत मात्र एक-दोन नव्हे, अशा तब्बल सात जोड्या सभागृहात दिसतील. सात जोड्या निवडून देणारी कदाचित ही पहिलीच महापालिका ठरेल. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेली चार दांपत्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेली दोन आणि एक अपक्ष अशी सात दांपत्ये पुढील पाच वर्षे सभागृहात जोडीने बसणार आहेत.

जमलं गणगोत
सात दांपत्यांसोबत दोन पिता-पुत्र, दोन पिता-पुत्री आणि एक सासू-सासरे-सुनेचे त्रिकूटही सभागृहात असणार आहे. एकाच घरात तीन नगरसेवक असलेली दोन कुटंुबेही आहेत. आहे की नाही गणगोतांचा स्नेहमेळावा?

राजकारणात घराणेशाही हा टीकेचा एक मुद्दा असताना नवी मुंबईत मात्र ही परंपराच गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. एकाच घरातील अशा वेगवेगळ्या नात्यांच्या जोड्या सलग चार टर्म जिंकून येत असल्याने नवी मुंबईत घराणेशाहीला लोकमान्यता मिळाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत गणेश नाईक यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेकडूनच एकाच घरातले अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. सातत्याने केलेल्या विकासकामांमुळेच हा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया सुधाकर सोनावणे आणि रंजना सोनावणे या दुसऱ्या नगरसेवक दाम्पत्याने व्यक्त केली. सोनावणे दाम्पत्य चार टर्मपासून अपक्ष म्हणून विजयी होत आहे, हे विशेष.

चिन्हाचा असाही घोळ
सुधाकर सोनावणे म्हणाले, माझी निशाणी शिलाई मशिन तर पत्नीची निशाणी होती रोडरोलर. त्यामुळे प्रचार साहित्यावर दोन्ही चिन्ह छापली होती. नेमके माझ्या प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह रोडरोलर होते. त्यामुळे माझ्या मतदारांमध्ये माझी बरीचशी मते त्या अपक्षाला गेली. मात्र लोकांच्या प्रेमामुळे विजयी होऊ शकलो.

घराणेशाही हा तर नाईकांचा वारसा
नवी मुंबईत घराणेशाहीचा जणू वारसाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा येथे शब्द चालतो. माजी मंत्री असलेल्या नाईक यांच्या कुटंुबातच काही वर्षांपासून प्रमुख पदे एकवटली होती. गेल्या टर्ममध्ये तर मंत्रिपदी असलेले नाईक बेलापूरमधून आमदार होते. शेजारच्या ऐरोलीमधून त्यांचा मुलगा संदीप नाईक हा पण आमदार होता. तर नाईकांचे थोरले पुत्र संजीव ठाण्याचे खासदार होते. त्याच वेळी पुतणे सागर नाईक महापौर होते.त्य

सात विजयी दांपत्ये
- अनिता-शिवराम पाटील : शिवसेना { सुरेश-राधा कुलकर्णी : राष्ट्रवादी काँग्रेस { रंजना-सुधाकर सोनावणे : अपक्ष
- शुभांगी-जगदीश गवते : शिवसेना { अपर्णा-नवीन गवते - राष्ट्रवादी काँग्रेस { कोमल - सोमनाथ वास्कर : शिवसेना
- विनया-मनोहर मढवी : शिवसेना

पिता-पुत्र जोडी
विजय चौगुले आणि ममित चौगुले : शिवसेना
मनोहर मढवी आणि करण मढवी : शिवसेना

बाप-लेकीची जोडी
अशोक गावडे आणि स्वप्ना गावडे : राष्ट्रवादी काँग्रेस
नामदेव भगत (शिवसेना ) आणि पुनम भगत (काँग्रेस)
सासरे, दोन सासू आणि एक सून : दशरथ भगत आणि पत्नी वैजयंती भगत, वहिनी फशीबाई भगत आणि सून रूपाली भगत.