आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Industries Clerification On Arvind Kejriwal Blame On Swiss Bank Account

केजरीवालांचे आरोप राजकीय स्वार्थापोटी- रिलायन्स इंडस्ट्रिजचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स कंपन्यांचे किंवा मुकेश अंबानी यांचे परदेशात किंवा भारतात कोठेही अवैध खाते नाही तसेच कोठेही काळा पैसा लपवून ठेवला नसल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने दिले आहे. तसेच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार आहेत. केजरीवाल यांनी केलेले आरोप हे वैयक्तिक व राजकीय स्वार्थापोटी केले असल्याचेही रिलायन्सने म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी रविवारी हरयाणातील रोहतक येथे झालेल्या सभेत अंबानी बंधूंचे स्विस बॅंकेतील अकाऊंटची यादी वाचून दाखवून दिली होती. तसेच या बंधूंचा परदेशात कर चुकवलेला काळा पैसा या बॅंकेत दडवलेला असल्याचे म्हटले होते. अंबानींना लक्ष्य करतानाच मोदी आणि राहुल गांधी हे त्यांच्या खिशातील खेळणे असल्याचे म्हटले होते. काळ्या पैशांबाबत मोहिम आखणा-या भाजपने तो पैसा परत आणण्यासाठी काय योजना आखली आहे ते सांगावे तसेच अंबानींचा पैसा भारतात आणून दाखवावा, असे आव्हान दिले होते.
त्यानंतर रिलायन्सचे काल उशिरा याबाबत खुलासा केला आहे. केजरीवाल यांचे आरोप चुकीचे असून त्यामागे त्यांचा स्व:ताचा व राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप रिलायन्सने केला आहे.