आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सची 4G सेवा डिसेंबरपासून, 4 हजारात स्मार्टफोन, 300 ते 500 मासिक बिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींनी पत्नी नीता यांच्यासह हजेरी लावली व जबरदस्त अशा घोषणा केल्या.) - Divya Marathi
(छायाचित्र- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींनी पत्नी नीता यांच्यासह हजेरी लावली व जबरदस्त अशा घोषणा केल्या.)
मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशाची प्रतीक्षा संपली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही दूरसंचार सेवा व्यावसायिक स्तरावर सुरू करण्याबरोबरच चार हजार रुपयांत 4-जी स्मार्टफोन कंपनी देणार आहे. त्याचे मासिक बिल 300 ते 500 रुपये असेल. ही घोषणा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची शुक्रवारी 41 वी बोर्ड मीटिंग झाली. यावेळी RIL चे चेयरमन मुकेश अंबानी यांनी कंपनी आगामी 12 ते 18 महिन्यांत 2 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. रिलायन्स जिओ ही 2015 अखेर 29 राज्‍यांत 4 जी सेवा सुरु करेल. याचबरोबर कंपनी मार्च 2016 पर्यंत देशातील सर्व रिटेल पेट्रोल पंप पुन्हा सुरु करेल. व्हॉईस आणि डेटाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्या दृष्टीने 4-जी सक्षम स्मार्टफोन डिसेंबरपर्यंत बाजारात येईल आणि त्याची किंमत हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गुंतवणूकदारांशी बोलताना सांगितले.
आपल्या दूरसंचार सेवेअंतर्गत ग्राहकांना बातम्या आणि मनोरंजन सेवा पुरवण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन बाजारात आणण्याचे संकेतही अंबानी यांनी या वेळी दिले. याचबरोबर 8 प्रादेशिक भाषांत वेगवेगळे 14 चॅनेल सुरु करणार असल्याचे अंबानींनी सांगितले.

मासिक 300 ते 500 रुपये खर्च-
10 ते 15 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या सुधारणांच्या पावलावर पाऊल टाकत शहरे तसेच ग्रामीण भागातील प्रत्येकाला पॉवर ऑफ कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन आणि इन्फर्मेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येण्याची योजना आहे. ही सर्व सुविधा मासिक 300 ते 500 रुपये खर्चात मिळेल, अशी मनीषादेखील अंबानी यांनी या वेळी व्यक्त केली.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला अंबानी परिवाराने लावली हजेरी...
बातम्या आणखी आहेत...