आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Jio Calls For Regulation Of Voice & Messaging Apps Like WhatsApp, Skype

व्हाॅट्सअॅप, स्काइपला परवान्याचा दूरसंचार कंपन्यांचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दूरसंचार कंपन्यांनी अाता व्हाॅट्सअॅप अाणि स्काइप यासारख्या ‘अाेव्हर द टाॅप’ (अाेटीटी) कंपन्यांना परवाना देण्याचा प्रस्ताव ठेवला अाहे. परंतु इंटरनेट कंपन्या अाणि त्यांच्या संघटनांनी मात्र या प्रस्तावाला अापला विराेध दर्शवला अाहे. विशेष म्हणजे भारतीय दूरसंचार िनयामक प्राधिकरणाच्या (ट्राय) ‘नेट न्यूट्रिलिटी’च्या मुद्द्यावरील मसुदापत्रावर सर्व कंपन्यांनी अापले मत व्यक्त केले अाहे. या मसुदापत्राबाबत मत व्यक्त करण्यासाठी २४ एप्रिल ही शेवटची तारीख हाेती. या मसुदापत्रावर मत तसेच सूचना व्यक्त करणाऱ्या १० लाखांपेक्षा जास्त लाेकांची नावे अाणि त्यांचे ईमेल अायडी सार्वजनिक जाहीर केले अाहे. व्हीअाेअायपी दूरसंचार सेवांसाठी याेग्य िनयामक अािण व्यावसायिक समाधान शाेधण्याची गरज व्हाेडाफाेन इंिडयाने व्यक्त केली अाहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यात त्यादृष्टीने पुरेशी तरतूद असल्याने त्यासाठी वेगळ्या िनयमाची गरज नाही असे मत नॅस्काॅमने व्यक्त केले अाहे.