आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio 4G फोन मिळेल फुकटात...1500 रुपये रिफंडेबल डिपॉझिट आणि लाइफटाइम कॉलिंग फ्री!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा 'धमाका' केला आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) जिओने देशातील पहिला स्वस्त आणि स्मार्ट 4G फीचर फोन लॉन्च केला. विशेष म्हणजे जिओच्या 4G व्होल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य आहे. मात्र, यासाठी 1500 रुपये सिक्युरिटी डिपॉ‍झिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. 3 वर्षांनंतर ते परत (रिफंड) केले जातात. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी प्रीबुकींग करता येईल. सप्टेंबरपासून फोनची डिलिव्हरी मिळणार आहे. 

जिओ फोनचे फीचर्स...
अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 4 वे नेव्हिगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4'', QVGA डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट, मायक्रोफोन अॅण्ड स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्चलाइट, एफएम रेडियो.

व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेसोबत अनेक फीचर आहेत. तसेच जिओच्या सर्व अॅप्स या फोनसमोत अगदी मोफत मिळणार आहेत. सोबतच लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच 22 भाषांचा समावेश करण्‍यात आल्याचे आकाश अंबानी यांनी माहिती दिली आहे.

अनलिमिटेड धनधनाधन प्लान केवळ 153 रुपयांत...
जिओने फोनसोबतच डेटा प्लानही लॉन्च केले आहेत. दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रूपयांत तर आठवड्यांचा प्लॅन 54 रूपयांत  उपलब्ध करून दिला आहे. टीव्ही केबलचा प्लान 309 रूपये (प्रति महिना) असेल. त्याचप्रमाणे अनलिमिटेड  धनधनाधन प्लान 153 रूपयांत उपलब्ध करून दिला आहे. एका आठवड्याला 50 लाख ग्राहकांपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचे रिलायन्सने लक्ष्य ठेवले आहे.

24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येईल.  
जिओचा नवा स्मार्ट 4G फोन 24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येईल. सप्टेबरपासून फोनची डिलिव्हरी मिळेल. प्रत्येक आठवड्याला 5 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची ग्वाही मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

मोबाईल डेटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले- मुकेश अंबानी
जिओच्या माध्यमातून आम्ही 12 महिन्यांत देशातील 99% लोकांपर्यंत पोहोचल्याचे रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सचा निव्वळ नफा 30 हजार कोटी, 3 लाख 30 हजार कोटींची उलाढाल आहे. मोबाइल डेटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

अंबानी यांनी सांगितले की, भारतात 78 हजार कोटी फोन आहेत. 50 कोटी लोकांना स्मार्टफोन सुविधा मिळत नाहीत. देशात 50 कोटी फीचर फोन आहेत. ज्यांना स्मार्टफोनचे फायदे घेता येत नाहीत. एका सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले जात आहेत. मुकेश अंबानींच्या भाषणादरम्यान धीरुभाई अंबानींचा उल्लेख झाल्याने सर्व जण भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' कॅम्पेनचेही मुकेश अंबानी यांनी आभार मानले आहेत.

कोकिलाबेन यांना अश्रू अनावर...
मुकेश अंबानी कंपनीच्या यशस्वी कामगिरीबद्दल माहिती देत असताना त्यांना वडील धीरुभाईंचे स्मरण झाले. त्यावेळी कोकिलाबेन यांना आपले अश्रू अनावर झाले. धीरुभाई अंबानी यांनी आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या जोरावर रिलायन्सचे विश्व उभे केल्याचे मुकेश अंबांनी यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. जिओच्या स्वस्त 4G फोनचे फोटो आणि फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...