आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स जिओची 1 एप्रिलपासून मोफत डेटा सेवा बंद, 99 रुपयांत प्राइम मेंबरशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स जिओची सेवा 1 एप्रिलपासून मोफत राहणार नाही. मात्र 31 मार्चपर्यंत ग्राहक होणाऱ्यांना अनलिमिटेड डेटा, कॉल व मीडियासारख्या सेवा 303 रुपयांच्या मासिक शुल्कावर मिळतील. त्यासाठी मार्चमध्ये 99 रुपये भरून प्राइम मेंबरशिप घ्यावी लागेल. या नव्या ऑफरचा फायदा पुढील वर्षीच्या 31 मार्चपर्यंत मिळेल. प्राइम मेंबरशिप न घेणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळा टेरिफ प्लॅन असेल.
 
 रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, जिओवर व्हाइस कॉल नेहमी मोफत असेल. प्राइम मेंबरशिप नसलेल्या ग्राहकांना  दुसऱ्या ऑपरेटर्सपेक्षा 20 टक्के जास्त डेटा मिळेल. जिओ ग्राहकांचा आकडा 10 कोटींच्या वर गेला आहे. एवढे ग्राहक केवळ 170 दिवसांत मिळाले. म्हणजेच दररोज प्रतिसेकंद सुमारे 7 ग्राहक जिओकडे आले.
 
डेटा वापरात भारत नं. 1
अंबानींच्या मते, जिओचे ग्राहक रोज 200 कोटी मिनिटे व्हाइस व व्हिडिओ कॉल व 3.3 कोटी जीबीपेक्षा जास्त डेटा वापरतात. आजवर 100 कोटी जीबीपेक्षा जास्त डेटा वापरला गेला. त्यामुळे मोबाइल डेटा वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला. जिओ सुरू होताना डेटा वापरात भारत 150व्या स्थानी होता.

हेही वाचा...Reliance Jio चा 99 रुपयांचा नवा प्लान; वर्षभर मिळेल हॅप्पी न्यू ईयर ऑफर
 
मोबाईल डेटाचा वापर करण्यात जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला रिलायन्स जिओची 4G सेवा लॉन्च केली होती.
 
काय म्हणाले मुकेश अंबानी?
-  केवळ 6 महिन्यात भारतीयांनी सिद्ध केले की, ते जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगवान आणि मोठ्या प्रमाणात डाटाचा वापर करू शकतात. ग्राहकांचे खुप आभार.
- जिओवरून प्रत्येक मिनिटाला 2 कोटी व्हॉइस कॉल करण्यात आले.
- रिलायन्स जिओच्या ग्रहकांची संख्या 10 कोटींवर पोहोचली आहे. भारत, डेटाचा वापर करण्यात जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे.
- 1 एप्रिलपासून जिओ टॅरिफ प्लॅनची सुरूवात करणार आहे. टॅरीफनंतरही व्हॉइस कॉल आणि रोमिंग फ्री असणार आहे. सर्व नेटवर्कवर व्हॉइस कॉल फ्री असणार आहे. 
- जे लोक जिओसोबत आहेत त्यांना येत्या काळात सर्वात जास्त फायदा मिळणार आहे.

1 मार्चपासून जिओ प्राइम मेंबरशिप प्लॅन
- मुकेश अंबानी यांनी 1 मार्चपासून जिओ प्राइम मेंबरशिपची घोषणा केली आहे. 
- त्यांनी सांगितले की, 99 रुपयांत एका वर्षासाठी जिओ प्राइम मेंबरशिप देणार आहे. प्राइम मेंबर्सना 303 रूपयांचा प्लॅन देण्यात येणार आहे.
 
मुकेश अंबानी म्हणाले होते- जिओत आनखी इन्वेस्टमेंन्ट होइल
- येत्या काळात जिओत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होइल असे संकेत मुकेश अंबानी यांनी दिले होते. त्यात 1.7 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे.
- जानेवारीत कंपनीच्या बोर्डने 30 हजार कोटी मजूर केले होते. या पैशाचा वापर नेटवर्क वाढवण्यासाठी आणि  कव्हरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी करण्यात यावा असे सांगितले होते.  
- मीडिया रिपोर्टसनुसार जिओच्या लॉन्चीगवेळी मुकेश अंबानींनी 10 कोटी सब्सक्राइबर्सपर्यंत पोहोचण्याचे टारगेट ठेवले होते.  
- कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितले की 6 महिन्यातच जिओने 10 कोटी सब्सक्राइबर्सचे टारगेट पुर्ण केले होते. 
- काही कंपन्यांनी जिओच्या फ्री सेवेला अव्हानदेखिल दिले होते. 
- भारती एन्टरप्राइजेसचे प्रमुख सुनील मित्तल म्हणाले होते की, जिओचे फ्री सेवेमुळे इतर कंपनींच्या बिजनेसवर परिणाम होत आहे. 
- वोडाफोन आणि आयडियाने मर्जरची घोषना केली होती. 
- जिओने इतर कंपन्यांवर आरोप केला होता की, ते नेटवर्कची व्यवस्थित सुविधा देण्यात कमी पडत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...