आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Set Up Electricity Distribution Project State

‘रिलायन्स’चा राज्यात वीज वितरण प्रकल्प; औरंगाबाद, पुणे, बीड एकमेंकाना जोडले जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने राज्यात विद्युत पारेषण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे, औरंगाबाद ही प्रमुख औद्योगिक केंद्रे व बीड शहर जोडण्यास मदत होणार आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी रिलायन्स पॉवर ट्रान्समिशनने ही पारेषण वाहिनी टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पश्चिम विभाग विद्युत प्रणाली बळकट करण्याच्या योजनेचा भाग म्हणून पुणे ते परळी ही 311 कि.मी लांबीची विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ ललित जालान म्हणाले की, पुणे - परळी पारेषण वाहिनी ही राष्ट्रीय ग्रीड प्रकल्पाचा भाग असलेली देशातील पहिली खासगी मालकीची पारेषण वाहिनी आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर देशाच्या पूर्व भागातून सुमारे 4 हजार मेगावॅट अतिरिक्त विद्युत ऊर्जा पश्चिम भागाला मिळू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.
या 1,500 कि.मी. लांबीच्या प्रकल्पासाठी 1,700 कोटी खर्च अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक किंमत प्रक्रियेवर आधारित भाडेपट्टीनुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालेला हा प्रकल्प बांधा, मालकी व चालवा तत्त्वावर आधारित आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर सध्या देशात 6,600 कोटी खर्चाचे पाच प्रकल्प राबवत आहे.