आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relief For Raj Thackeray, Bombay Hc Quashes Hate Speech Case

राज ठाकरेंचे भाषण प्रक्षोभक नव्हतेच

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज ठाकरे यांच्यावर विक्रोळी येथील एका भाषणात भडक विधाने केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे सिद्ध होऊ शकणार नाहीत, त्यामुळे न्यायालयात जाऊ नये, असा सल्ला राज्याच्या विधी व न्याय विभागाने राज्य सरकारला दिला होता, असा खुलासा खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी केला. हे प्रकरण सरकारच्या परवानगीशिवाय पुढे चालणार नाही हे माहीत असल्यानेच आरोपपत्र दाखल केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘अबू आझमी हे उत्तर भारतीयांच्या हातात काठ्या देत असतील तर मीही मराठी तरुणांच्या हातात लाठ्या देईन’, असे विधान राज यांनी 2008 मधील सभेत केले होते. त्यानंतर काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे राज यांच्यावर प्रक्षोभक भाषणे देणे, धार्मिक भावना दुखावणे, दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कलमांखाली गुन्हे दाखल करताना राज्य सरकारची परवानगी लागते म्हणून पोलिसांनी ती मागितली होती. मात्र, विधी व न्याय विभागाने भाषणाची तपासणी केली असता त्यात त्यांना हे गुन्हे दाखल करावेत, असे आक्षेपार्ह काहीच वाटले नाही. यामध्ये ‘जर-तर’ अशी विधाने असल्याने ते न्यायालयापुढे सिद्ध करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले होते.