आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोग्राफरने बॉलिवूड अॅक्ट्रेसला दिला होता ग्लॅमरचा तडका, माधुरीसह अनेकांना बनवले स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौतम राजाध्यक्ष यांनी माधुरी दीक्षित यांचे अनेक फोटो क्लिक केले होते. इन्सेटमध्ये गौतम राजाध्यक्ष. - Divya Marathi
गौतम राजाध्यक्ष यांनी माधुरी दीक्षित यांचे अनेक फोटो क्लिक केले होते. इन्सेटमध्ये गौतम राजाध्यक्ष.
मुंबई- बॉलिवूडमधील जवळपास सर्वच दिग्गज स्टार्सला आपल्या कॅमेर्‍यात कैद करणारे फेमस फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांचा आज (13 सप्टेंबर) स्मृतिदिन. राजाध्यक्ष यांचे 2011 मध्ये आजच्याच दिवशी हार्टअटॅकने निधन झाले होते. गौतम यांनी क्लिक केलेल्या फोटोमुळेच धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह अनेक अॅक्ट्रेसला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली होती, असेही म्हटले जाते.

राजाध्यक्ष यांची फोटो बोलतात...
- गौतम यांनी क्लिक केलेले फोटो आपल्याशी बोलतात, असेही म्हटले जाते. त्यांनी खर्‍या अर्थाने इंडियन फोटोग्राफीला आंतरराष्‍ट्रीय ग्लॅमर दिला होता.
- ते एक लेन्समनसोबतच लेखक, टीकाकार आणि सांस्कृतिक चिंतकही होते. त्यांनी नवोदित फोटोग्राफर्सला मार्गदर्शन केले. त्यांना दिशा दाखवली.
- मुंबईतील सेंट जेव्हियर कॉलेजमधून त्यांनी केमेस्ट्रीमध्ये पदवी घेतली. इतकेच नाही तर त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून दोन वर्षे नोकरीही केली. 1974 मध्ये ते जाहिरात एजन्सी 'लिंटास'चे फोटो सर्व्हिस डिपार्टमेंटचे विभागाध्यक्ष बनले.
- त्यांनी क्लासमेट्स शबाना आझमी, टीना मुनीम आणि जॅकी श्राफ यांचे फोटो क्लिक केले. सोबतच फॅशन फोटोग्राफीच्या क्षेत्रात 1980 मध्ये पदार्पण केले.
- गौतम राजाध्यक्ष यांचा 16 सप्टेंबरला वाढदिवस.

अनेक सिनेमांसाठी क्लिक केलेत फोटोज...
- 'हम साथ साथ हैं', 'हू-तू- तू', 'कुछ-कुछ होता है' आणि 'हम आपके हैं कौन' सिनेमांसाठी स्टिल फोटोग्राफर म्हणून राजाध्यक्ष यांनी काम केले.
- राजाध्यक्ष ओपेरा 'रेकार्डिंग्ज' संग्रह करण्‍याचा छंद होता. त्यांनी अनेक टॉक शोमध्ये सहभागही घेतला होता.
- एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले होते की, नूतन, हेमा मालिनी, लता मंगेशकर तसेच माधुरी दीक्षित, लिजा रे आणि ऐश्वर्या राय ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे.
 
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... गौतम राजाध्यक्ष यांनी कॅमेर्‍या शूट केलेल्या स्टार्सची निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...