आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत होर्डिंग्ज १५ ऑक्टोबरपर्यंत काढा; मुंबई हायकोर्टाचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि फलक १५ ऑक्टोबरपर्यंत काढून टाका, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना शुक्रवारी दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती अभय ओक आणि अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याबाबत सुस्वराज संस्थेच्या भगवानजी रियानी यांनी याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीत हायकोर्टाने अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याबाबत महापालिकांना आदेश दिले होते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात राज्यभरात अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले. त्यावर न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...